मी गेल्यावर

तू नात्याची पूस आसवे मी गेल्यावर;
जळू नको माझ्या चितेसवे मी गेल्यावर.

माझी साधी ओळख तेव्हा विसरलीस तू;
आज एवढे काय आठवे मी गेल्यावर !

जीवनभर मी ह्या दु:खाला रक्त पाजले;
त्यास विचारा काय तुज हवे मी गेल्यावर.

खडा पहारा ओठांवर दातांचा असता;
जिभेस का ते गुपित बोलवे मी गेल्यावर.

जाळ आपल्या पत्रांना त्या जुन्यापुराण्या;
लिहू लाग तू मजकूर नवे मी गेल्यावर.

अपरात्रीला कधी पापणी भिजवेल उशी;
डोळ्यात चमकतील काजवे मी गेल्यावर.

जरी न आला मला तोडता कधी पिंजरा;
जाळे घेउन उडतील थवे मी गेल्यावर.

Read more...

शीर्षक क्लीक करा : गझल वाचा

*******************************************************

*******************************************************

Read more...

डॉ.अविनाश सांगोलेकरांचा लेख :

ऐका : सुरेश वाडकर : घेतात दु:खितांचा

ऐका : सुधाकर कदम : दु:ख माझे देव झाले

ऐका : भीमराव पांचाळे : दु:ख देखणे तुझे

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP